मुंबई लोकल (Mumbai Local) मधून दिवसाला हजारो लोक प्रवास करत असतात. परंतु लोकलला स्टेशनवर येण्यास थोडा जरी उशिर झाल्यास प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येतेच. पण प्रवाशांकडून संताप सुद्धा व्यक्त केला जातो. एवढेन नव्हे तर लोकलमध्ये ऐन गर्दीतून डब्यात चढणे म्हणजे मोठी कसरतच प्रवाशांना करावी लागते. या दरम्यान होणारी ढकलाढकली आणि वाद काही नवे नाहीत. तर असाच एक प्रकार मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात घडला आहे. सहप्रवाशासोबत रेल्वे डब्याच्या दरवाज्याच्या बाजूला उभे राहण्यावरुन जोरदार वाद झाला. या दोघांमधील वाद एवढा विकोपाला गेला की, सहप्रवाशाने बोट चावून तोडल्याचा धक्कादायक प्रकार त्यावेळी घडला.
दादर स्थानकातून घरी जाण्यासाठी महेश ढुंबरे यांनी लोकल पकडली. तर महेश यांनी आसनगाव फास्टलोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात ते चढले. परंतु कुर्ला स्थानकात आसिफ नावाचा व्यक्ती चढला आणि महेश यांना दरवाज्याच्या बाजूला उभे राहण्यासाठी धक्काबुक्की करु लागला. आसिफच्या या प्रकारामुळे महेश संतप्त होत त्या दोघांत वाद झाला. एवढेच नाही तर आसिफने महेश यांच्या शर्टाची कॉलर खेचल्याने बटण तुटले. त्याचवेळी आसिफ याने महेश यांच्या बोटाचा जोरात चावा घेतला.(मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान कडाक्याचे भांडण, सहप्रवासी महिलेच्या हाताचा चावा घेत ओरबाडले)
या प्रकारानंतर महेश यांच्या बोटामधून रक्त येण्यास सुरुवात झाली. तसेच चालत्या गाडीत आसिफ याने जोरजोरात शिवीगाळ सुद्धा करण्यास सुरुवात करत त्यांना बाहेर फेकून देईन असे धमकावले. मात्र लोकलच्या अन्य डब्यातील प्रवाशांनी आसिफ याच्या वागण्याबाबत जीआरपींना माहिती दिली. तर ठाणे स्थानकात लोकल पोहचताच आसिफ याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. परंतु महेश यांच्या हाताचे बोट तुटल्याने त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.