प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Instagram)

मुंबईच्या लोकलमधून (Mumbai Local) दिवसाला हजारो-लाखो नागरिक प्रवास करत असतात. परंतु जर लोकलला येण्यासाठी थोडा उशिर झाल्यास रेल्वे स्थानकात मोठी गर्दी दिसून येते. त्यानंतर रेल्वे डब्यात चढण्यासाठी सुद्धा मोठी कसरत करावी लागते. परंतु अशावेळी एखादी महिला तापट असल्यास तिला जरासुद्धा धक्का लागल्यास लगेच भांडण करण्यास सुरुवात करते. असाच प्रकार मुंबईच्या लोकलमध्ये घडला असून ऐन गर्दीत दोन महिलांचे एकमेकांसोबत कडाक्याचे भांडण झाले. या दोघींमधील वाद एवढा विकोपाला गेली की, सहप्रवासी महिलेने पीडित महिलेच्या हाताचा चावा घेत तिला नखांनी ओरबाडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नजराना अंसारी असे पीडित महिलेचे नाव असून ती प्रभादेवी (Prabhadevi) स्थानकातून वांद्रे (Bandra) येथे जाण्यासाठी निघाली होती. परंतु प्रवासादरम्यान महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी होती. त्यावेळी लोकलच्या दरवाज्याचा बाजूला उभ्या असलेल्या एका महिलेने नजराना हिना धक्काबुक्की केली. पण उलट महिलेने स्वत:ची चूक कबुल करण्याऐवजी नजराना हिच्यासोबत तावातावाने बोलू लागली. तसेच अंगाला हात लावण्यापूर्वी तू माझ्याशी बोलून शकली असतीस, चुकून जर तुझा धक्का लागून खाली कोसळली असती तर काय झाले असते असा प्रश्न नजराना हिने महिलेला विचारले.

परंतु लोअर परळ स्थानकात आणखी काही महिला चढल्याने डब्यात अधिकच गर्दी झाली. त्यावेळी पुन्हा महिलेने नजराना हिला धक्काबुक्की केली. त्यावेळी नजराना हिने तिला नीट समजावत थोडं बाजूला सरकून उभे रहा असे सांगताच महिलेचा पारा चढला आणि तिने नजराना सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या दोघींमधील वाद एवढा वाढला की, नजराना हिच्या सोबत झटापटी करत तिच्या हाताला महिलेने चावा घेतला.(मुंबई: ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील पूल जड वाहनांसाठी बंद ; पश्चिम रेल्वेचा निर्णय)

या सर्व भांडणाच्या स्थितीत नजराना हिचे 9 हजार रुपयांचे कानातले आणि रुबी रिंग हरवली असल्याचे सांगितले. या प्रकरणी नजराना हिच्या सोबत घडलेल्या घटनेची तक्रार मुंबई सेंट्रल पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली असून सदर महिलेचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.