खारघर: संतापजनक! रस्त्यावरील कुत्रीवर व्यक्तीकडून बलात्कार, पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Unsplash)

मुंबई (Mumbai) मधील खारघर( Kahrghar) येथे रस्त्यावरील कुत्रीवर बलात्कार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्राणीमित्र कार्यकर्ता विजय रंगारे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पेटा इंडिया (PETA India) यांच्या मदतीने हा प्रकार समोर आणला आहे. तर एका व्यक्तीकडून कुत्रीवर बलात्कार करण्यात आल्याची ही प्रथमच घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच बलात्कार केलेल्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करत कलम 377, 1860 अंतर्गत प्राण्यांवर बलात्कार करणे आणि 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात यावी असे आदेश नवी मुंबई मधील खारघर आणि पनवेल मधील वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत. त्याचसोबत व्यक्तीकडून यापूर्वी सुद्धा प्राण्यांचे लैंगिक शोषण केले असावे असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला शिक्षा न देता सोडले असता ती व्यक्ती माणसावर सुद्धा हल्ला करु शकते असे सुद्धा बोलण्यात आले आहे.(Lucky कुत्र्यासाठी एकवटले मुंबईकर, वरळीत अमानुष मारहाण प्रकरणानंतर बॉलिवूड कलाकारांसह आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना)

class="article_auth_time_blk"> कुत्रीवर बलात्कार केल्याची घटना ही धक्कादायक असून ज्याने हे कृत्य केले आहे तो व्यक्ती मानोरुग्ण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मनोरुग्ण असणाऱ्या व्यक्ती फक्त प्राण्यांनाच नाही तर माणसांना सुद्धा मारहाण किंवा लैगिक शोषण करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्याचसोबत मानसिक तणावाखाली असणाऱ्या व्यक्तींबाबत सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर 60 टक्के महिलांनी व्यक्ती या त्यांच्या पार्टनरला जखमी करण्याचा प्रयत्न करतातच. त्याचसोबत कुत्र्यांना किंवा अन्य प्राण्यांचा जीव सुद्धा घेतात.