मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) भागात लकी (Lucky) नावाच्या कुत्र्याला गेल्या आठवड्यात अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामुळे लकीची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आल्याने सोशल मीडियात मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. तसेच मुंबईकरांसह बॉलिवूड कलाकार आणि शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे.
24 जुलै रोजी लकी नावाच्या भटक्या कुत्र्याला वरळीतील एका इमारतीमधील दोन गार्डस त्याला अमानुषपणे मारहाण करत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले. या प्रकारानंतर त्याला उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले असून नागरिक त्यांची प्रकृती ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. तर बॉम्बे ग्रुप ऑफ अॅनिमल राईट्स हे लकीच्या उपचाराबद्दल काळजी घेत असून त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट सोशल मीडियात पोस्ट करत आहेत.
Worli, Turf view Building... For Lucky❤️
Join the protest for Lucky and all little soul who suffer every day on street...✊🙏#justiceforlucky #prayforlucky #worlidog pic.twitter.com/MQbqrwC56V
— Muzammil Shaikh (@itz_MuzammilsK) July 30, 2019
लकीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याची अवस्था दयनीय झाल्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यावरुन आदित्य ठाकरे यांनीसुद्धा दुख व्यक्त केले असून मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करावी असे ट्वीटमधून म्हटले आहे.
What’s happened with the dog in Worli is not just sad but immensely disturbing. To think that such inhuman behaviour exists towards creatures taking shelter during rain. I would want to see that the man responsible for it is punished with maximum penalty.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 30, 2019
ऐन पावसाळ्यात रस्त्यावरील भटके कुत्रे निवाऱ्यासाठी जागा शोधत असतात. परंतु त्यांच्यासोबत अशी गैरवर्तवणूक करणे चुकीचे असल्याचे म्हटले जात आहे. तर अभिनेत्री आलिया भट्ट हिने PETA यांना ट्वीटवर टॅग करत या प्रकाराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.