मुंबईतील एमसीजीएम पूल आणि कांदिवली रेल्वे स्थानकातील दक्षिण दिशेला असणारा पादचारी पूल दुरुस्तीसाठी पुढील 10 दिवस म्हणजेच 30 मार्च पर्यंत बंद राहणार आहे. पुलाची दुरुस्तीसह अन्य काम करण्यात येणार असल्याने 20 मार्च मध्यरात्रीपासून नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण दिशेकडील पूल बंद केल्यानंतर नागरिकांना पश्चिम दिशेकडील पूलाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
कांदिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथील पादचारी पुल हा 20 मार्च मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे. हा पुल 19 मे 2020 पर्यंत असे एकूण 60 दिवस बंद राहणार आहे. याच दरम्यान, या पादचारी पुलाच्या दक्षिणेकडील पादचारी पूल आणि प्लॅटफॉर्म क्र. 1 वरील उपलब्ध असलेले इतर दोन पादचारी वरचे पूल वापरू शकतात. या कारणास्तव, पश्चिम रेल्वेने प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.(Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी)
तसेच सायन उड्डाण पुलाचे काम सुद्धा कमी करण्यात आले आहे. त्यानुसार पुलाचे काम करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्या काळात पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. सायन पुलाच्या कामानिमित्त पुढील ब्लॉक 26 ते 30 मार्च आणि 2 ते 6 एप्रिल या दरम्यान घेतले जातील. सायन उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत प्रवाशांना वाहतूककोंडीला सामारे जावे लागत असले तरी एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत पूलाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज एमएसआरडीसीने व्यक्त केला आहे.