मुंबई हायकोर्टात महाराष्ट्रातील महापुराविरोधात याचिका दाखल
Mumbai High Court | (File Photo)

महाराष्ट्रातील कोल्हापूर(Kolhapur), सांगली (Sangli)-साताऱ्यासह अन्य राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. या पुरस्थिती जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. तसेच या पुरात काहीजण वाहून गेल्याने मृतांचा आकडा मोजतानासुद्धा अंगावर काटा येतो. याच पार्श्वभुमीवर मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court)  महाराष्ट्रात आलेल्या या महापुराविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत महापुरामागील कारण हे नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉ. संजय लाखे-पाटील यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. अलमट्टी धरणामधील पाणी तातडीने न सोडल्यास येथे पुरस्थिती निर्माण होईल असे 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपत्तीनिवारण विभागाला सांगण्यात आले होते. मात्र त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनाने याकडे कानाडोळा केला. त्यांचाच या दुर्लक्षपणामुळे आज कोल्हापूर-सांगली सारखी पुरस्थिती निर्माण झाल्याचे लाखे-पाटील यांनी म्हटले आहे.(Maharashtra Floods: पुणे विभागात पुरामुळे 54 लोकांचा मृत्यू; 8000 पेक्षा जास्त जनावरे ठार तर 19,702 घरे नष्ट)

महापुराची ही आपत्ती मानवनिर्मित असल्याचे घोषित करण्याच यावे अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या प्रकरणी आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख, संबंधित मंत्री, धरण संचालक यांच्या सह अन्य दोषी व्यक्तींची चौकशी करण्यात यावी असे सुद्धा लाखे-पाटील यांनी याचिकेतून म्हटले आहे. हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील आठवड्या मुख्य न्यायमुर्तींसमोर सुनावणी होणार आहे.