Vande Bharat Trains (फोटो सौजन्य - PTI)

मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसला (Mumbai-Gandhinagar Vande Bharat Express) आता अजून एक थांबा मिळाला आहे. 23 जानेवारी पासून ही ट्रेन बोरिवली स्थानकामध्ये (Borivali Station) थांबणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे कडून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बोरिवली स्थानकामध्ये थांबा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे Train No. 20901/20902 ही मुंबई सेंट्रल -गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस आता नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे.

मुंबई सेंट्रल- गांधी नगर वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये आता एका थांबा वाढवला गेला असल्याने या ट्रेनच्या वेळापत्रकामध्येही काहीसा बदल झाला आहे. 23 जानेवारी पासून बोरिवली स्थानकात ही ट्रेन 6.23 ला येईल आणि 6.25 ला सुटेल. मुंबई सेंट्रल स्थानकातूनही ही ट्रेन 6.10 ऐवजी 6 वाजता सुटेल. त्यानंतर वापी स्थानकातही ही ट्रेन 7.56 ला येऊन 7.58 ला सुटेल. अन्य कोणत्याही स्थानकात यामुळे बदल होणार नाही.

परतीचा प्रवास करताना ट्रेन गांधीनगर वरून सुटल्यानंतर बोरिवली स्थानकात संध्याकाळी 7.32 ला येणार आणि 7.34 ला सुटणार आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात रात्री 8.15 ऐवजी आता नव्या वेळापत्रकानुसार 8.25 ला पोहचणार आहे.

ट्रेन च्या वेळापत्रकातील अन्य बदल

बोरिवली स्थानकात थांबा वाढवण्यासोबतच आता मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत ट्रेनच्या धावण्याच्या दिवसांतही बदल झाला आहे. बुधवार वगळता आता ही ट्रेन अन्य सार्‍या दिवशी धावणार आहे. पूर्वी ही ट्रेन रविवार वगळता धावत होती. पण हा बदल 30 मे 2023 पासून लागू होणार आहे. Advance Reservation Period नुसार त्याच बुकिंग सुरू होईल. नरेंद्र मोदींनी 30 सप्टेंबर 2022 दिवशी या ट्रेनला हिरवा कंदील दाखवला होता.