मुंबई: वरळी विधानसभा मतदारसंघ मध्ये निवडणूक आयोगाकडून 4 कोटी रूपयांची अवैध रोकड जप्त
Images For Representation | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

वरळी विधानसभा मतदारसंघ (Worli Constituency) हा यंदाच्या निवडणुकीत वारंवार चर्चेचा विषय ठरला होता. शिवसेनेचे (Shivsena) आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांची उमेदवारी असो वा त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरलेले अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) हे तर नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरले. मात्र आज विधानसभा निवडणूक पूर्व प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा वरळी मधून आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानी आज ,6.30 वाजता चेकींग सुरू असताना एका टेम्पोतून 4 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलं. वांद्रे-वरळी  सी लिंक (Bandra-Worli Sea Link)जवळील चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली  याबाबत अद्याप सखोल खुलासा झाला नसला तरी पोलिसांचा तपास सुरु आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी आज 19 ऑक्टोबर रोजी प्रचाराचा अंतिम दिवस होता. संध्याकाळपर्यंत राज्यभरात सर्वच पक्षांच्या सभा, रोड शो पार पडले. येत्या सोमवारी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होईल आणि त्यानंतर 24 तारखेला निकाल जाहीर होतील. हे संपूर्ण निवडणूक सत्र सुरळीत व कायदेशीर पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाकडून वारंवार काळजी घेतली जात आहे, मात्र तरीही अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त झाल्याच्या घटना सतत समोर येत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मुंबईत निवडणूक आयोगाकडून 2,90,50,000 रोकड जप्त, अधिक तपास सुरु

ANI ट्विट

दरम्यान, या पूर्वी धारावी मतदार संघामध्ये एका कारमध्ये अशाप्रकारे 63 लाख 9 हजार 755 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वीच मुंबईत एक इसमाकडे 2 कोटी 90 लाख 50 हजार रुपये संशयित रित्या आढळले होते.