सायन हॉस्पिटलमध्ये ( Sion Hospital ) आज (9 एप्रिल) विद्यार्थ्यांनी, डॉक्टरांनी आरक्षण हे जातीनिहाय न देता गुणवत्तेनुसार द्यावं या मागणीसाठी एकत्र येऊन प्रोटेस्ट केला आहे. लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमध्ये राज्यभरातून विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी येतात. मात्र सध्या जातीनिहाय आणि सवर्ण आरक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रकिया अधिक किचकट झाल्या आहेत. Maharashtra PG Medical Admission 2019 प्रवेशप्रक्रियेत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
ट्विट
#NewsAlert: Doctors at Sion Hospital stage a protest demanding reservation based on merit. pic.twitter.com/JqoobHcHlo
— Mumbai Mirror (@MumbaiMirror) April 9, 2019
सध्या पूर्वीच्या आरक्षणासोबतच मराठा समाजाला 16% आणि सवर्ण आरक्षण 10% लागू करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाविरोधात अद्याप कोर्टामध्ये खटला सुरू आहे. त्यावरील निकालानंतरच मेडिकल किंवा इतर प्रवेशप्रकियेमधील आरक्षणाचा निकाल घेता येणार आहे.
आज मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये आरक्षणाच्या गोंधळामुळे अनेक गुणवत्तांना प्रवेशप्रक्रियेपासून दूर रहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जातीनिहाय आरक्षण हटवण्याची मागणी केली आहे.