Maratha Reservation | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात शिक्षण आणि नोकरीमध्ये 16% मराठा समाजाला  आरक्षण (Maratha Reservation) देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर अनेकांनी कोर्टात मराठा आरक्षणाला आव्हान देणार्‍या याचिका दाखल केल्या आहेत. सध्या या याचिकांवरील अंतिम निकाल अजूनही देण्यात आलेला नाही. परिणामी सध्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता. त्यावर आज मुंबई हाय कोर्टात (Bombay High Court) सुनावणी करताना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल अ‍ॅडमिशनमध्ये (Postgraduate MedicalAdmission)प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

'ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे त्यांना आरक्षणाचा लाभ देऊन कायद्याचा भंग झाला असल्याचे सांगत मराठा आरक्षण विरोधक जनहित याचिका स्थगित करण्यासाठी काहींनी कोर्टात धाव घेतली होती, मात्र त्यावर आज सुनावणी करताना मेडिकल अॅडमिशनदेखील मुख्य याचिकांच्या निकालावर अवलंबून असल्याचं सांगत सध्या मेडिकल प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देता येणार नाही असा निर्णय न्यायाधीश रणजीत मोरे आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने दिला आहे. Maratha Caste Certificate : जात प्रमाणपत्र ऑनलाईन, ऑफलाईन मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?

कोर्टाकडून सध्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली नसल्याने सुरू असलेल्या प्रवेशप्रकियेमध्ये 16% जागा या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातील.