Artificial Pond Set Up in Kurla (Photo Credit: ANI)

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला (Chhath Puja 2020) घातली आहे. छठ पूजेसाठी समुद्रावर होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही, अशी शंका मुंबई महापालिकेला आहे. दरवर्षी छट पूजेसाठी मुंबईच्या जुहू बीचवर लाखोंच्या संखेने भाविक एकत्र येतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, छठपूजनाच्या तिसर्‍या दिवशी कुर्ल्यात उभारलेल्या कृत्रिम तलावावर भाविकांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला आहे.

बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जुहू बीचवर दरवर्षी छठ पूजेसाठी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. छट पूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक समुद्रकिनारी, तलाव, नदी किनारी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही अटी घातल्या आहेत. मात्र, तरीदेखील काही भागात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असताना दिसत आहे. हे देखील वाचा- Chhath Puja 2020: मुंबई महापालिकेने समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी घातल्यानंतर नागरिकांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

एएनआयचे ट्विट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक समाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सण लॉकडाऊनच्या निर्बंधाखाली साजरी करावे लागले आहेत. सध्या मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. यामुळे नागरिकांनी नेहमी तोंडावर मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन गरजेचे आहे.