दादर फुल मार्केट (Photo Credits-File Image)

उद्यापासून सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने नागरिकांनी बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, कोरोना व्हायरसचे सावट असताना सुद्धा दादर मधील फुल मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी करत खरेदी करत असल्याचे दिसून आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखायचा असल्यास सर्व नियम आणि अटींसह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशा सुचना दिल्या आहेत. मात्र दादर मधील फुल मार्केट मध्ये या नियमांचा फज्जा उडवत नागरिकांनी खरेदीसाठी बहुसंख्येने गर्दीच केली होती. नागरिकांना चालण्यासाठी सुद्धा एकमेकांना चिकटून जावे लागत होते.(Ganpati Visarjan 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी बाप्पाच्या विसर्जनाला सजले खास रथ; पाहा त्याची वैशिष्ट्ये)

एखादा सण आला की दादर मधील फुल मार्केट हे नेहमीच गजबजून जाते. तसेच खरेदी करताना काळजी घेणे सुद्धा तितकेच अवघड असते. पण कोरोनाचे संकट असताना सुद्धा नेहमी प्रमाणेच गर्दी झाल्याचे दिसून आले. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, दादर मधील फुल मार्केटमध्ये फुले स्वत दराने मिळत असल्याने विविध ठिकाणाहून येथे नागरिक खरेदी करण्यासाठी येतात.(Ganesh Chaturthi 2020: सोलापूर मध्ये बाले गावातील तरूणांनी साकारलं गणपती बाप्पाचं ग्रास पेटिंग द्वारा विलोभनीय रूप Watch Video)

पहा व्हिडिओ:

दरम्यान यंदा कमीत कमी लोकांमध्ये, घरच्या घरी आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन प्रशासनाकडून गणेशभक्तांना करण्यात आले आहे. गणेशमूर्तीची कमाल उंची 4 फूट असेल. तर यंदा मिरवणूका, आगमन, विसर्जन सोहळा, धामधूम नसेल.