Ganpati Visarjan 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी बाप्पाच्या विसर्जनाला सजले खास रथ; पाहा त्याची वैशिष्ट्ये
Ganesh Visarjan (Photo Credits: Facebook)

देशभरात दरवर्षी प्रमाणे जरी गणेश चतुर्थीची (Ganesh Chaturthi 2020) धामधूम पाहायला मिळत नसली तरीही घरगुती गणपतींसाठी मात्र जोरदार तयार सुरु असून ती अंतिम टप्प्यात आली आहे असे म्हणायला हरकत नाही. गणेश चतुर्थीची विशेष धामधूम पाहायला मिळते ती मुंबई शहरात... मात्र यंदा कोरोनाचे (Coronavirus) सावट असल्यामुळे घरच्या घरी अगदी साधेपणाने सर्वांनी हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. मात्र कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) गणपतीचे विसर्जन करायचे कसे असा प्रश्न भेडसावत असताना त्यांच्या मदतीला धावून आले आहे भारतीय जनता युवा मोर्चा. या संघाने 'विसर्जन आपल्या दारी' (Visarjan Aaplya Dari) या अभिनव उपक्रम सुरु केला असून यासाठी खास विसर्जन रथ बनविला आहे. ज्यात कृत्रिम तलाव बनविण्यात आला आहे.

या विसर्जन रथाचे वैशिष्ट्य म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक मुंबईत एकटे राहतात आणि ज्यांच्या घरी गणपती असतो. अशा नागरिकांसाठी या रथात खास कृत्रिम तळ बनविण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने नागरिकांना आपल्या दारातच या रथातील तळ्यात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करता येईल. Ganesh Chaturthi 2020 Pran Pratishthapana Muhurat: गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा गणेश चतुर्थी 2020 चा मुहूर्त, पुजा विधी घ्या जाणून

सध्या कोरोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून अनेक ज्येष्ठांना घराबहेर पडता येत नाही आहे. यामुळे ऑनलाईन गणेश मूर्ती ही सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे अन्य नागरिकही सोशल डिस्टंसिंगचे भान राखत ऑनलाईन गणपती बुक करु शकता. मात्र त्याचे विसर्जन कसे करणार असा प्रश्न अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडला होता. त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव आम्ही हा उपक्रम राबविणार असल्याचे BJYM च्या प्रमुखांनी सांगितले.

यासाठी रोज ट्रान्सपोर्ट करिता वापरण्यात येणारे ट्रक फुलांनी छान सजविण्यात आले आहेत. ज्यात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तळं बनविण्यात आले आहे. त्यामुळे दीड दिवस, पाच दिवस, 7 दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी हा रथ वापरण्यात येणार आहे.