Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Shiv Sena (UBT) News: मुंबई येथून एक धक्कादायक बातमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena: Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या महिला माजी नगरसेविका सिद्धी खुरंगसे यांच्या घरात अज्ञातांनी प्रवेश करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात खुरसंगे यांची पुतणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. ) बोरिवली (Borivali News) पूर्व परिसरातील अभिनव नगर येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोर पसार झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना दुभंगली. परिणामी शिवसेनेची दोन शकले झाली. त्यातील एक शकल निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेल्या शिवसेनेला मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली. परिणामी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे यांच्याकडे गेले. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडे मूळ शिवसेनेतील काही नेते राहिल्याने. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन त्यांचा पक्ष सुरु ठेवला. शिवसेनेतील या बंडखोरीमुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतो आहे. (हेही वाचा, MPSC Student Attack: तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून आरोपीचे कृत्य; पुणे येथील घटना)

आजवर ठाकरे कुटुंबीय अथवा शिवसेना पक्षावर टीका झाली तर, तीव्र प्रतिक्रार करणारे शिवसैनिक विभागले गेले. त्यातून शिवसैनिक एकमेकांसमोर प्रथमच भिडताना पाहायला मिळत आहे. अशा वेळी दोन्ही गटांमध्ये अधूनमधून हिंसक संघर्षही पाहायला मिळतो आहे. त्यामुळे या हल्ल्याला राजकीय पर्श्वभूमी तरत नाही ना? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दुसऱ्या बाजूला, मध्यंतरी एका पदयात्रेत जाहीर चुंबन घेतल्याच्या कथीत घटनेमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी पीडित तरुणीची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याचे समजते. सुर्वे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची विचारपूस केल्याचे समजते.