MPSC Student Attack:  तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून आरोपीचे कृत्य;  पुणे येथील घटना
MPSC student attack- Photo credit- twitter

MPSC Student Attack:  पुणे हे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं अन् तिथंच अश्या प्रकारचं कृत्य घडून येत आहे. राज्यभरात दर्शना पवार हत्याकांड प्रकरणी खळबळ उडाली असताना पुण्यात एका तरुणाने भररस्त्यात कोयत्याने तरुणीवर वार करतानाची घडना समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात एका (MPSC) करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. नशीबाने त्या तरुणीला वाचवण्यासाठी स्थानिक तरुणाने वाचवलं. पेरुगेट जवळ ही घटना घडली आहे.

सुत्राच्या माहितीनुसार ह्या तरुणीला गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्दा तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, ती तरुणी त्या हल्लेखोर व्यक्तीला ओळखत असल्याचे समोर आले आहे. एकतर्फी प्रेमामुळे तीच्यावर हल्ला झाल्याचे सांगितले आहे. तरुण मुलीने हल्लाखोर व्यक्तीशी बोलणं बंद केल्यामुळे हे सगळं घडले. हल्ला करणारा तिचा मित्र असल्याचे समोर आले आहे. तो देखील पुण्यात एम पी एस सी (MPSC) करत असल्याचे समोर आले आहे.

कोयत्याने हल्ला करत असताना  ती तरुणी  कशाबसा जीव बाचवत धावत राहिली. तेवढ्यात लेसपाल  जवळगे नावाच्या तरुणाने तीचा जीव वाचवला. लेशपालने त्या हल्लेखोर व्यक्तीच्या हातातून कोयता घेतला यादरम्यान तेथील स्थानिक लोकांनी लेशपालला मदत करण्यासाठी धाव घेतला. हल्लाखोराला स्थानिक लोकांनी पोलीसांच्या ताब्यात घेतले आहे. ह्या प्रकरणाची चौकशी पोलीस पुढे करत आहे.