Drowning (Representational Image/ Photo Credits: PTI)

सांगली (Sangli) येथील एका 24 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून कृष्णा नदीत उघी घेत आपले आयुष्य संपवले आहे. तर एकतर्फी प्रेमातून तरुणीकडून नकार मिळाल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

अबरार झाकीर झाकीर मुलाणी असे तरुणाचे नाव आहे. तर एकतर्फी प्रेमाच्या नैराश्यात असलेल्या अबरार याने स्वामी समर्थ घाट येथून कृष्णा नदीत उडी घेतली. त्यावेळी नदीत पोहणाऱ्या व्यक्तींकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र जीव वाचवण्यापूर्वी अबरार याचा मृत्यू झाला होता.(अकोला: वर्गातील शुल्लक भांडणातून विद्यार्थ्याला भोकसले)

नदीत उडी घेण्यापूर्वी तरुणीला त्याने स्वामी समर्थ घाटात बोलावले. तर दोघांत दहा मिनीटांत बोलणे झाले. दरम्यान अबरार याने तरुणीला वारंवार माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होता. मात्र तरुणीने आपण मित्रमैत्रीण म्हणून नात्यात राहूयात असे सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या अबरार याने नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे.