Mumbai Crime: नेहरूनगर मध्ये महिलेवर आणि अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला, पोलिस चौकशी सुरु
Attack | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Crime: नेहरू नगर मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास एका व्यक्तीने महिला व तिच्या मुलीवर चाकूने हल्ला करून जखमी केले. स्वत:ला वाचवण्यासाठी महिला आणि मुलगी घराबाहेर पडली असता व्यक्तीने स्वत:वर वार केला दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेने नेहरू नगर पोलिसांना या प्रकरणी तक्रार दिली आहे, मृत व्यक्ती निषादने त्यांच्या घरात घुसून 35 वर्षीय महिला आणि तिच्या 14 वर्षीय मुलीवर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी जखमी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, निषाद हा तिच्या पतीला ओळखत होता आणि लॉकडाऊनच्या काळात तो तिच्या घरी जेवण करायला यायचा.

 या वर्षी निषादचे लग्न झाले आणि तेव्हापासून तो जेवायला येत नव्हता. बुधवारी निषादने महिलेच्या घरी जावून चाकू काढून महिलेवर हल्ला केला. आईवर हल्ला होत असल्याचे पाहून तिची 14 वर्षांची मुलगी तिला वाचवण्यासाठी पुढे आली, त्यानंतर निषादने तिच्या मुलीवरही हल्ला केला. दरम्यान, महिलेने घराचा दरवाजा उघडून आपल्या मुलीला बाहेर पळायला सांगितले. दोघीही जखमी अवस्थेत बाहेर आल्या. पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. जखमी महिलेला आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले,

पोलीसांनी दरवाजा घडला तेव्हा निषाद हा जखमी अवस्थेत सापडला, त्याला रुग्णालयात दाखल केले पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी जखमी महिलेला आणि मुलीला विचारणा केली असताना दोघींन्ही काहीच सांगितले नाही. या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहे. निषाद मुंबईत एकटाच राहत होता. पोलिस त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून त्यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे