Bangladeshi Citizens | (Photo Credit: ANI/X)

मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) - युनिट 6 ने गेल्या सहा दिवसांत मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या (Illegal Stay) नऊ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, बांगलादेशी स्थलांतरित नागरिक (Bangladeshi Citizens) म्हणून ओळखल्या गेल्या आहेत.ज्यांनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला, बनावट आधार कार्ड बनवले आणि बँक खाती उघडली आणि ते निवास करु लागले. इतकेच नव्हे तर त्यांनी, भारतातून बांगलादेशात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित (Money Laundering) केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरु केली. ज्यामध्ये केलेल्या कारवाईत हे नऊ नागरिक आढलून आले. पोलिसांनी सध्या त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

मोडस ऑपरेंडी:

डीसीपी राज टिळक रोशन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बांगलादेशातून कामासाठी येणाऱ्या लोकांना पैसे देऊन मदत केली. या लोकांनी मुंबईमध्ये पैसै, निधी कमावला आणि हवालाद्वारे बांगलादेशात पाठवण्यात आला, असा त्यांच्यावर आरोप आहे. बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट आधार कार्ड तयार केले आणि बँक खाती उघडली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त केली आहेत. हे लोक भारतात स्वतंत्रपणे आले आणि मग मिळून राहू लागले की, बांग्लादेशातून येतानाच हे सर्व लोक सोबत आले होते, याबातब सध्या चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी ओळखले ; भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे वादग्रस्त विधान)

तपास तपशील:

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गेल्या काही दिवसांपासून मुंबई राहत असल्याची माहिती आहे. ते पोलिसांच्या रडारवर आहेत. मात्र, अद्याप पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नसल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपींना दिलेली बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. ते लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकतील अशी आशा आहे.  (हेही वाचा, माशांना खाऊन त्यांच्या प्रजाती नष्ट करणारा बांगलादेशी 'मांगूर' माशाची महाराष्ट्रात घुसखोरी; जाणून घ्या आरोग्यावर दुष्परिणाम)

एएनआय पोस्ट

कायदेशीर कार्यवाही:

दरम्यान, बेकायदेशीर वास्तव्य आणि हवालाद्वारे पैसे बांगला देशात पाठविलेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्व नऊ आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने यापैकी पाच जणांना 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवेरी रेल्वे स्थानकाजवळ पकडण्यात आलेला एक एजंट आणि त्याची महिला साथीदार यांचा समावेश आहे. जे बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर प्रवेशासाठी कमिशनवर काम करत होते. रोजगारासह, आणि त्यांची कमाई बांगलादेशात हस्तांतरित करण्यासही ते त्यांना मदत करत होते. पाठिमागील काही दिवसांपासून पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या आणि निवास करत असलेल्या नागरिकांबद्दल कारवाई सुरु केली आहे.