माशांना खाऊन त्यांच्या प्रजाती नष्ट करणारा बांगलादेशी 'मांगूर' माशाने (Mangur fish) महाराष्ट्रात घुसखोरी केली आहे. या माशाच्या सेवन केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊन वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मांगूर माशांची महाराष्ट्रातील घुसखोरी (Infiltration) रोखणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात मांगूर माशावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, तरीदेखील मांगूर माशाची विक्री केली जात आहे. सरकारने आतापर्यंत महाराष्ट्रात 100 टनपेक्षा जास्त मांगूर मासे जप्त केले आहेत. तसेच या माशांच्या उत्पादनावरही बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारी पुणे मत्स्य व्यवसाय विभागाने इंदापूर तालुक्यात कालठण येथे अवैध मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. कालठण येथे मांगूर मासे तळ्यातून बाहेर काढून नष्ट करण्यात आले आहेत. (हेही वाचा - जपान: 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील 2 वयोवृद्ध प्रवाशांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू)
मांगूर हा माशाची कमी किमतीत विक्री केली जाते. तसेच हा मासा खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आहे. त्यामुळे सामान्य लोक मांगूर मासे खरेदी करतात. परंतु, हे मासे खाल्ल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. मांगूर माशाचा मानवी आरोग्यास आणि पर्यावरणाला धोका लक्षात घेऊन केंद्रीय हरित लवादाने या माशाच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. भारतात बांगलादेशमधील मांगूर मासे बेकायदा पद्धतीने महाराष्ट्रात येत असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मांगूर माशांवर बंदी घालण्यात आली आहे. या माशांपासून विविध प्रकारचे रोग पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मत्स्य विभागाकडून मांगूर माशांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात येत आहे.