Kailash Vijayvargiya (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना, " कपड्यांवरून सुद्धा CAA च्या विरोधकांना ओळखता येईल" असे विधान केल्यावर आता त्यांच्या पाठोपाठ भाजप नेते कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी सुद्धा हाच कित्ता गिरवला आहे. इंदूर प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या 'लोकशाही, राज्यघटना आणि नागरिकत्व' चर्चेत बोलत असताना विजयवर्गीय यांनी आपण पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशींना ओळखल्याचा किस्सा सांगितला. वास्तविक नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणल्यापासून देशभरातून अनेक संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेक विरोधी पक्ष व विद्यार्थी संघटनांनी मिळून या निर्णयाला विरोध करता असताना काही राज्य व भाजप नेत्यांकडून या निर्णयाच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. हेच समर्थन करता असताना विजयवर्गीय यांनी सुद्धा "आपण अधिकृत रहिवाश्यानावर अन्याय करणार नाही मात्र घुसखोरांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही" असे सांगत हा किस्सा शेअर केला होता, या वरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, कैलास विजयवर्गीय यांनी बोलत असताना, 'माझ्या घरातली एक खोली मी हल्लीच दुरुस्त करून घेतली. त्या कामावर असलेले मजूर एकदा पोहे खात होते. त्यांची खाण्याची पद्धत मला थोडी विचित्र वाटली. ते मजूर बांगलादेशी आहेत का, याची चौकशी मी कंत्राटदाराकडं केली. त्या मजुरांनाही हाच प्रश्न विचारला. पण त्यानंतर ते कामावर आलेच नाहीत,' असा अनुभव सांगितला. जर का ते रहिवासी असते तर त्यांना भीती कसली ते बांग्लादेशी घुसखोर असल्याने त्यांनी प्रश्नानंतर पुन्हा तोंड दाखवले नाही या प्रकरणी मी अद्याप पोलिसांकडे तक्रार केलेली नाही पण लोकांना जागरूक करण्यासाठी मी हा किस्सा सांगतोय. असं ते म्हणाले.

दरम्यान, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हानही विजयवर्गीय यांनी देशवासियांना केले आहे. नागरिकत्व कायदा देशाच्या भल्यासाठीच आहे. या कायद्यामुळं खऱ्या शरणार्थींना नागरिकत्व मिळणार असून घुसखोरांची ओळख पटणार आहे. हे घुसखोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक आहेत,' असेही विजयवर्गीय यांनी उपस्थितांना सांगितले.