मुंबई येथील कुर्ला पश्चिम परिसरातील मेहता इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या असून आगीला आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

 भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत केंद्रीय गृहखात्याने राज्य सरकारला कळवले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. मात्र, याआधीच याप्रकरणाचा तपास राष्टीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. यामुळे राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असे वातावरण निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. 

जनतेवर मनमानी कर लादणं हा सामाजिक अन्यायचं आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी व्यक्त केलं आहे. कर चोरी हा जसा आर्थिक गुन्हा आणि सामाजिक अन्याय ठरतो, त्याचप्रमाणे सरकारने जनतेवर मनमानी कर लादणं हादेखील एकप्रकारचा सामाजिक अन्यायचं असल्याच बोबडे यांनी म्हटलं आहे.  

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (Maharashtra State Road Development Corporation) अर्थातच एमएसआरडीसी कडून मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवर फास्टॅग (FASTag) सेवा आजपासून (शुक्रवार, 24 जानेवारी) सुरु करण्यात आली. या आधी शहरामध्ये फास्टॅग सेवा सुरु करण्यासाठी  MSDRC कडून 15 जानेवारीपर्यंत समयसीमा वाढवून देण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी वाढती रहदारी आणि त्यातून निर्मण होणारी वाहतूक कोंडी याचा निपटारा करण्यासाठी सॉफ्टवेअर चाचणी करण्यासाठी ही समयसीमा वाढवून देण्यात आली होती. प्राप्त माहितीनुसार सुमारे 50,000 वाहने वाद्रे-वरळी सागरी सेतूवरुन मार्गक्रमण करतात.

आता मुंबईकरांना आपल्या घरात राहत असलेल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती जवळच्या पोलीस ठाण्‍यात द्यावी लागणार आहे. याबाबत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने मालकांना निर्देश  दिले आहेत. दहशतवादी घटना आणि असामाजिक घटकांकडून परिसरातील कायदा, सुव्यवस्थेला धोका पोहोचू नये, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून या सूचना देण्यात आल्या आहेत.  

म्हाडाकडून उपलब्ध होणाऱ्या गृहसाठ्यांपैकी दहा टक्के सदनिका सोडतीतून पोलीस कॉन्स्टेबलसाठी तर दहा टक्के सदनिका चतुर्थश्रेणी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित करणार, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार- गृहनिर्माणमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.

सावधान! आपण नोकरी करत आहात आणि वेतनाद्वारे मिळणारे आपली वार्षिक कमाई 2.5 लाख रुपये इतकी असेल तर आयकर विभागाच्या नव्या नियमांबाद्दल लगेच जाऊन घ्या.  कारण आपण काम करत असलेल्या कंपनीत आपण जर आपला आधार आणि पॅन कार्ड क्रमांक (PAN and Aadhaar Details) दिला नाही तर, आपल्यासमोर मोठीच समस्या निर्माण होऊ शकते. आयकर विभागाने (Departement of Tax) नुकताच एक नवा नियम लागू केल्याचे समजते. त्यानुसार जर एखाद्या कंपनीने आपल्या कंपनीकडे आपला आधार आणि पॅन कार्ड क्रमांक उपलब्ध करुन दिला नाही. तर संबधित कर्मचाऱ्याच्या पगारातून तब्बल 20 टक्के  TDS (Tax DFeducted At Source) कपात केली जाऊ शकते.

चीन कोरोना विषाणूने (व्हायरस) बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वुहान शहरात केवळ 10 दिवसांच्या कालावधीत नवं रुग्णालय उभारत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाला गुरुवारपासून सुरुवात झाली. येत्या 3 फेब्रुवारीला या रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. आत्तापर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे, 

ठाणे शहर परिसरात सांडपाण्यांवर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादन घेत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर महालिकेकडे आल्या होत्या. त्यामुळे अशा तक्रारींची दखल घेत महापौर नरेश मस्के यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. ज्या ठिकाणी अशा भाज्या पिकवल्या जात होत्या त्या जागांवर थेट बुलडोजर फिरवुन कारवाई करण्यात आली

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मागे घेतला असला तरी, नांदेड येथे मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, औरंगाबाद, चेंबूर, अमरावती, जालना येथेही बंदला हिंसक वळण लागले.

Load More

आज महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली असून याला वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अन्य 35 संघटनांनी सीएए, एनआरसी, एनपीएच्या विरोधात बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे अर्थव्यवस्था ढासळत असल्याने त्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बंदची हाक दिली असली तरीही जागोजागी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. राज्यव्यापी बंदची हाक दिली असली तरीही नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटवर झालेला नाही. या ठिकाणी विविध जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक झाली आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

16 जानेवारीलाच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. तर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.