मुंबईमध्ये पावसात रस्त्यांची चाळण झाल्याने अनेक अपघात झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण यंदा मुंबईमध्ये चक्क पादचारी रस्त्यावर उघड्या गटारात गाय पडून अडकल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार मुंबईतील कांदिवली (Kandivali) भागात घडला आहे. अग्नीशामक दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे या गायीला बाहेर काढले आहे. काल चांदिवली परिसरात रस्स्ता खचल्याची घटना समोर आली होती.
ANI Tweet
Mumbai: A cow got stuck in a gutter in Kandivali West area around 6:30 am today; was later rescued by fire brigade team. #Maharashtra pic.twitter.com/q5LG1pupax
— ANI (@ANI) July 3, 2019
मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळे मुंबईतील रस्स्त्यावर पाऊस कोसळत आहे. या पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेकदा लोकं स्वतः हून मॅनहोल उघडी करतात. तर अनेक ठिकाणी पावसाळ्यात गटारावरील झाकणं खराब होतात त्यामुळे उघड्या राहिलेल्या गटारात पडून दुर्घटना होतात. मागील वर्षी अशाचप्रकारे एक डॉक्टर वाहून गेला होता.
मुंबईत पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.