Gunratna Sadavarte यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; जामीनासाठी अर्ज ते एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतल्याची कबुली पहा काय काय घडलं?
Gunaratna Sadavarte | (File Image)

एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' निवासस्थानी काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचार्‍यांनी केलेल्या आक्रमक आंदोलनाप्रकरणी अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. आज गिरगाव न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. दरम्यान एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आता पर्यंत आपण मानद काम करत असल्याचं म्हणत होते पण आज त्यांनी कोर्टात आपण एसटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतल्याचं कबुल केले आहे. आता त्यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज सादर केला असून त्याची सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे. हे देखील नक्की वाचा: Protest Outside Silver Oak: गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध कलम 120-बी आणि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल .

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी एक पैसे मोजायचं मशीन सापडलं आहे. आज न्यायालयात बोलताना त्यांनी आपण कर्मचार्‍यांकडून 200,300 रूपये घेतल्याचं म्हटलं आहे. 48,000 एसटी कर्मचारी आपले क्लायंट आहेत. इतके कमी पैसे कोणता वकील घेतो? असा सवाल त्यांनी आपली बाजू मांडताना केला आहे. तसेच काही संशयास्पद वस्तू सापडल्यानेही सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

गुणरत्न यांनी परळ आणि भायखळा मध्ये मालमत्ता व एक गाडी खरेदी केली आहे. संपकाळात खरेदी करण्यात आलेल्या या मालमत्तेबाबत चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं आहे. तर गुणरत्ने यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करताना त्याच्याबद्दल कोणाचीही तक्रार नमूद नाही मग पोलिस कोठडीची गरज काय? सध्या घरामध्ये केवळ त्यांची लेक असून ती पोलिसांना सहकार्य करत असल्याचं म्हटलं आहे. तर जागा आधीच घेतलेली आहे आणि कार मी घेऊ शकत नाही का? असा सवाल विचारत आर्थिक व्यवहारांबद्दलचे आरोप त्यांनी फेटाळले आहेत.

गिरगाव न्यायालयात आज पोलिस कोठडीमध्ये वाढ झाली असली तरीही सातारा न्यायालयात त्यांना आक्षेपार्ह वक्तव्याच्या दुसर्‍या प्रकरणामध्ये दिलासा मिळाला आहे. त्यामध्ये त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.