Mumbai Building Collapse Update: भायखळा मधील मिश्रा इमारतीचा भाग कोसळल्याच्या दुर्घटनेत 12 वर्षीय मुलीसह 70 वर्षीय महिलेचा मृत्यू-BMC
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

दक्षिण मुंबईतील नागडपाडा परिसरातील इमारतीचा भाग कोसळ्याची दुर्घटना गुरुवारी घडल्याचे समोर आले. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली चार जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. त्यांनी असे म्हटले होते की, शुक्लाजी रोडवरील स्थित असलेल्या मिश्रा इमारतीच्या टॉयलेटचा भाग दुपारी 1 वाजता कोसळला. या प्रकरणी आता जखमी झालेल्या 12 वर्षीय लहान मुलीसह 70 वर्षीय महिलेचा जेजे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याबद्दल मुंबई महापालिकेने माहिती दिली आहे.(Raigad Building Collapse: तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 16; 36 तासांनंतरही बचावकार्य सुरू)

इमारतीचा भाग कोसळल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच रुग्णवाहिकांची सुद्धा तेथे उपस्थिती दिसून आली. यानंतर बचाव कार्य सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.(Mumbai Building Collapse: दक्षिण मुंबई मधील नागपाडा परिसरातील 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, 4 जण अडकल्याची शक्यता; बचावकार्य सुरु)

दरम्यान दोन दिवसांपूर्वी रायगड मधील महाड मध्ये तारिक गार्डन इमारत कोसळून झालेल्या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमध्ये मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले जातील, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दृघटनाग्रस्तांबद्दल संवेदना व्यक्त करत शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.