Raigad  Building Collapse:  तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 16; 36 तासांनंतरही बचावकार्य सुरू
Raigad | Photo Credits: Twitter/ ANI

रायगडमधील महाड (Mahad)  येथील तारिक गार्डन इमारत कोसळून आता 36 तास उलटून गेले आहेत. दरम्यान या दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा आता 16 पर्यंत पोहचला आहे. एनडीआरएफ आणि अन्य बचावकार्य करणार्‍या संघटनांकडून 7 पुरूष आणि 9 महिलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही एका व्यक्तीचा शोध लागणं बाकी असल्याने बचावकार्य सुरू ठेवले जाणार आहे. Raigad Building Collapse Rescue Operation: तारीक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर 19 तासांनी चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी ची NDRF पथकाकडून सुखरूप सुटका(Watch Video)

काल (25 ऑगस्ट) एनडीआरएफ कडून 19 तासांनंतर 4 वर्षाच्या चिमुकल्याला तर रात्री एका महिलेला सुखरूप मातीच्या ढिगार्‍याखालून काढण्यात यश आले होते. दरम्यान 41 फ्लॅट्सच्या या 5 मजली इमारतीचे पिलर कमजोर होऊन कोसळल्याने ही दुर्घटना झाली आहे.

ANI Tweet

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी काल घटनास्थळाला भेट दिली आहे. त्यांनी या दुर्घटनेमध्ये मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले जातील असे सांगितले आहे. यावेळीस निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याने ही दुर्घटना झाली आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाईचे करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत.

तारीक गार्डन ही इमारत 24 ऑगस्टच्या संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास कोसळली. त्यानंतर तात्काळ बचत कार्याला सुरूवात झाली आहे.