दक्षिण मुंबई (South Mumbai) मधील नागपाडा (Nagpada) परिसरातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कमीत कमी 4 लोक अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दक्षिण मुंबईमधील नागपाडा परिसरातील शुल्काजी स्ट्रीट (Shuklaji Street) इमारतीच्या शौचालयाचा काही भाग आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोसळला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या, एक द्रुत प्रतिसाद वाहन आणि अॅब्युलन्स दाखल झाली आहे. दरम्यान बचावकार्य सुरु आहे. अद्याप याचे विस्तृत वृत्त हाती आलेले नाही.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी रायगड मधील महाड मध्ये तारिक गार्डन इमारत कोसळून झालेल्या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमध्ये मृतांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी मधून दिले जातील, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दृघटनाग्रस्तांबद्दल संवेदना व्यक्त करत शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.