Mumbai: विधवा वहिनीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या दिराला अटक; कारण वाचून व्हाल हैराण
Acid attack | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दिराने विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची (Acid Attack) धक्कादायक घटना मुंबई (Mumbai) मधील घाटकोपर (Ghatkopar) येथून समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिराला अटक केली आहे. प्रबुद्ध कांबळे (40) असं या अटक झालेल्या दिराचं नाव आहे. पीडिता ही आरोपीची वहिनी आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या हल्ल्यात पीडिता भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हल्ल्याचे कारण ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. (मुंबई: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलीवर पूर्ववैमनस्यातून अॅसिड हल्ला)

काही दिवसांपूर्वी पीडितेच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर घरच्यांवर अवलंबून राहावे लागू नये म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पीडित महिलेनं नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने सुदांशू प्रमाणिक यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात नोकरीसाठी विचारणा केली. प्रमाणिक यांनी होकार देताच तिने त्वरीत कामाला सुरुवात केली. परंतु, वहिनीने काम करण्याचा घेतलेला निर्णय आरोपी दिराला आवडला नाही. त्याने त्यास विरोध दर्शवला. मात्र पैसे कमावणं गरजेचं असल्याने पीडितेनं ज्वेलर्सच्या दुकानात आपले काम चालू ठेवले. या निर्णयामुळं चिडलेल्या दिरानं गुरुवारी रात्री आपल्या वहिनीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं. (Mumbai: पत्नी जायची जिमला, नवऱ्याला आला भलताच संशय; जिम ट्रेनरवर अॅसिड हल्ला करून झाला फरार)

या हल्ल्यात पीडितेच्या चेहऱ्यासह शरीरावर अनेक ठिकाणी भाजलं आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत.