Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus: देशभरासह राज्यातील विविध ठिकाणी कोरोना व्हायरसचे थैमान पहायला मिळत आहे. तर सध्या अनलॉकिंगनुसार काही गोष्टी ही सुरु करण्यास सरकारने परवागनी दिली आहे. मात्र जर कोरोनापासून बचाव करायचा असल्यास प्राथमिक पातळीवर मास्क घालणे किंवा सॅनिटायझरचा वापर करण्यासह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. परंतु मुंबईतील बहुतांश नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे सध्या दिसून येत आहे. याच कारणास्तव आता मुंबई महापालिकेने (Mumbai BMC)  मास्क (Face Mask)  न घालणाऱ्या नागरिकांच्या विरोधात बेधडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत मुंबई महापालिकेने तब्बल 18 लाखांचा दंड नागरिकांकडून वसूल केला आहे.

महापालिकेकडून गुरुवारी 9107 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 18 लाखांचा दंड वसूल केला आहे. तर कोरोनाच्या काळात 1.6 लाख लोकांवर कारवाई केली असून 3.5 कोटी रुपयांचा दंड शुक्रवार पर्यंत जमा झाला आहे. महापालिकेकडून कोरोनाच्या परिस्थिती बद्दल जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी शहरात No Mask No Entry असे 20 लाख स्टिकर्सचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क घालणे लक्षात राहिल हे यामागील उद्दिष्ट आहे. मात्र जर एखाद्या नागरिकाने दंड देण्यास नकार दिल्यास त्याला सार्वजनिक ठिकाणी कचरा काढण्याची शिक्षा दिली जाणार आहे.(Lockdown in Maharashtra Extended: महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवला; Mission Begin Again अंतर्गत चालू करण्यात आलेल्या सेवा मात्र नियमित सुरु)

दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडून मोहम्मद अन्सारी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अन्सारीकडे 17,300 मास्क आणि 10 हजार रिकामे पाउच आढळले असून त्याची किंमत 21.4 लाख रुपये आहे. या सर्व गोष्टी अनधिकृतपणे ट्रान्सपोर्ट केल्या जात होत्या. त्याला लोअर परेल येथून टेम्पो मधून जाताना ताब्यात घेण्यात आले.