Mumbai BJP Office Fire: मुंबईत नरिमन पाँईट येथील भाजप कार्यालयाला आग, किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना शॉर्ट सर्किट
Photo Credit - X

Mumbai BJP Office Fire : मुंबईत भाजप कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील नरिमन पाँईट भागात असणाऱ्या कार्यालयाला ही आग लागली आहे. आगीवर नियत्रंण मिळविण्याचं काम सध्या सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.  भाजच्या या कार्यलयातून पक्षाच्या संघटनेचे काम पाहिले जाते. (हेही वाचा :Food Poisoning: मुंबई विद्यापीठात दूषित पाणी पुरवठा; 40 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखीचा आजार )

आज रविवारनिमित्त कार्यालयात डागडुजीचे काम सुरु होते. ज्यात किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरु होते. अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे ही आग लागली. आग लागल्यानंतर धुराचे मोठे लोट हवेत पसरले आहेत. आग लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ उडाली. उपस्थितांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

कार्यालयात निवडणुकीच्या संबंधित काही कागदपत्रे आणि साहित्य होते. त्याचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही त्याचा तपास घेतला जात आहे.  या आगीत  कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, कार्यालयाचे काहीशा नुकसान झाले आहे.