Photo Credit - X

Food Poisoning: मुंबई विद्यापीठ(Mumbai University)च्या कलिना कॅम्पसमधील नूतन मुलींच्या वसतिगृहात (Girl Hostel)४० विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या प्रकृतीच्या अनेक समस्यांना तोंड देत होत्या. आता त्यांना विषबाधा झाल्याचे समजते आहे. वसतिगृहात लावण्यात आलेल्या वॉटर कुलरमुळे ही परिस्थीती निर्माण झाली नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

समोर आलेल्या माहितीवरून वसतिगृहात लावण्यात आलेल्या वॉटर कुलर याची योग्यती स्वच्छा राखण्यात येत नव्हती. परिणीमी विद्यार्थिनींर्थिनींना पोटाचे विकार झाले आहेत. वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर जवळपास एक वर्ष टँकरद्वारे पाणी पुरवठा होत होता. सध्या होत असलेला दूषिदूषित पाणी पुरवठा महापालिकेकडून होत आहे की अस्वच्छ कुलरमुळे याकडे वसतिगृह प्रशासनाचे लक्ष

आहे का.

युवा सेना माजी सिनेट सदस्यांनी वसतिगृहात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना अनेक त्रुटी आढळल्या . या त्रुटींची माहिती त्यांनी कुलगुरूंना दिली . तसेच येथील पाण्याची तपासणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट सोमवारी दिला जाणार आहे. येथील पाचपैकी फक्त तीनच कुलर वापरात आहेत. उर्वरित दोन अजून कार्यान्वित नाही तर ते दोनही कुलर तातडीने वापरासाठी घेण्याच्या सूचना अभि यंता विभागास देण्यात आल्या