उद्या गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईमधील मेट्रो-2A आणि मेट्रो-7 या मार्गांचे उद्घाटन होणार आहे. उद्यापासून हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले होतील. आता या दोन्ही मार्गांवरील मेट्रो स्थानकांपर्यंतची कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या प्रयत्नात, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम या स्थानकांना जोडणाऱ्या बस चालवणार आहे. या बेस्ट बसेस मेट्रो स्थानकांपासून जवळचे रेल्वे स्थानक, निवासी सोसायट्या, व्यावसायिक कार्यालये, शॉपिंग मॉल्स आणि लोक वारंवार भेट देत असलेल्या इतर ठिकाणी फीडर मार्गांवर कनेक्टर म्हणून काम करतील
या नवीन मार्गांसाठी गेले काही दिवस MMRDA आणि BEST उपक्रम यांच्यात चर्चा सुरू होती आणि आता त्यांनी शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीसाठी करार केला आहे. या वृत्ताला दुजोरा देताना बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, मेट्रो रेल्वे स्थानकांना जोडण्यासाठी ते लाईन 2A साठी 27 मार्ग आणि लाईन 7 साठी 49 मार्ग आणि लाईन 2A आणि लाईनसाठी 7 साठी प्रत्येकी एक असे दोन नवीन मार्ग सुरू करणार आहेत.
दहिसर ते डहाणूकर वाडी मेट्रो-2A आणि दहिसर ते आरे मेट्रो लाईन-7 ही व्यावसायिक वाहतूक 2 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. बेस्टला नवीन योजना आणि डिझाइन्स देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये अनेक बस थांबे संबंधित मेट्रो स्थानकांपासून 50-75 मीटरपेक्षा जास्त नसलेल्या योग्य अंतरावर हलवण्यात आले आहेत. ज्यामुळे मेट्रो स्टेशन बाहेर पडल्यानंतर प्रवाशाला बस घेता येईल. (हेही वाचा: म्हाडाकडून 10,764.99 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी, राज्यात नवीन 15,781 सदनिका बांधणार)
नवीन मेट्रो स्टेशनबाहेरील ऑटो-रिक्षा स्टँडचे नियोजन अशा प्रकारे केले जात आहे की, लोक मेट्रो स्थानकांच्या बाहेर रांगेत उभे राहू शकतील. बस आणि ऑटो-रिक्षाची वाट पाहत असताना प्रवाशांना बसण्याचीही व्यवस्था केली आहे.