
वांद्रे (Bandra) येथील पोलिसांनी बँकेच्या प्रसाधनगृहात महिला सहकाऱ्याचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी 29 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. तसेच आरोपीच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तो वरळी मधील राहणारा आहे. याबाबत हिंदूस्थान टाइम्स यांनी हे वृत्त दिले आहे.
अनिकेत परब असे आरोपीचे नाव आहे. वांद्रे मधील हिल रोड येथील एका सरकारी बँकेच्या येथे सुरक्षिततेसाठी त्याची ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळी अनिकेतची महिला सहकारी कपडे बदलण्यासाठी रेस्ट रुम येथे असलेल्या वॉशरुमध्ये गेली. परंतु या ठिकाणी काही वेळापूर्वी अनिकेत थांबलेला होता. महिला सहकाऱ्याने त्याला तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने कपडे बदलण्यासाठी वॉशरुममध्ये गेली असता तेथे लपवलेल्या फोनकडे तिचे लक्ष गेले. तसेच फोनकडे लक्ष जाऊ नये म्हणून तो रुमाल टाकून झाकण्यात आला होता. याबाबत तिने अनिकेत याला जाब विचारला. तेव्हा माझ्या फोनला का हात लावत तिच्यावर संताप व्यक्त केला.(नवी मुंबई: विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या)
तसेच महिला सहकाऱ्याने त्याच्यावर मोबाईलवर व्हिडिओ शूट केल्याचा आरोप लगावला असता तो दावा खोटा असल्याचे तिला भासवले. आरोपी अनिकेत याने त्याच्या मोबाईलमधील रेकॉर्ड केलेला व्हिडिओ डिलिट केल्याचा संशय महिला सहकाऱ्याने व्यक्त केला आहे. याबाबत वरिष्ठांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली असता अनिकेतच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचे महिला सहकार्याने स्पष्टीकरण दिले आहे.