Mumbai Rains: मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील वाहतूक तासभर ठप्प; 50 उड्डाणे रद्द, 27 मार्ग बदलले
Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Rains: सोमवारी मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील (Mumbai Airport) विमानसेवा विस्कळीत झाली होती. वृत्तानुसार, धावपट्टीवरील कामकाज एक तासापेक्षा जास्त काळ थांबवण्यात आले आणि 50 उड्डाणे रद्द करण्यात आली. कमी दृश्यमानता आणि मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर 50 उड्डाणे रद्द करण्यात आली. इंडिगोच्या 42 उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात 20 निर्गमन उड्डाणे समाविष्ट आहेत. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, एअर इंडियाला सहा उड्डाणे रद्द करावे लागले.

27 उड्डाणे वळवण्यात आली -

सरकारी मालकीच्या अलायन्स एअरलाही दोन उड्डाणे रद्द करावी लागली, ज्यात एक निर्गमन आणि एक आगमन फ्लाइट समाविष्ट आहे. मुंबईकडे जाणारी अनेक उड्डाणे वळवण्यात आली. याआधी, सकाळी 2:22 ते पहाटे 3:40 पर्यंत धावपट्टीचे कामकाज स्थगित केल्यानंतर 27 उड्डाणे अहमदाबाद, हैदराबाद आणि इंदूर सारख्या जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली होती. (हेही वाचा - IndiGo’s Advisory Amid Mumbai Rains: मुंबई मध्ये जोरदार पावसाचा फटका विमान सेवेलाही; इंडिगो कडून प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन)

मुंबईत पुढील काही तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार, दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत, मुंबईत मुसळधार पावसाची नोंद झाली. शहरामध्ये सरासरी 115.63 मिमी पाऊस झाला, तर पूर्व आणि पश्चिम भागात अनुक्रमे 168.68 मिमी आणि 165.93 मिमी पावसाची नोंद झाली. (हेही वाचा - Mumbai Traffic Update: मुंबई मध्ये Western Express Highway वर रस्ते वाहतूक संथ गतीने; Andheri Subway पाण्याखाली. )

याशिवाय पूर्व मुंबईतील गोवंडी येथे सर्वाधिक 315.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पवईत 314.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम मुंबईत, अंधेरीतील मालपा डोंगरी येथे 292.2 मिमी तर चकला येथे 278.2 मिमी पाऊस झाला आहे. प्रतीक्षा नगर येथे 220.2 मिमी तर शिवडी कोळीवाड्यात 185.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.