मुंबई: अभिनेता 'एजाज खान' ला जामीन मंजूर; 1 लाख रूपयांच्या हमीवर सुटका
एजाज खान (Photo Credits: Facebook)

फेसबुकवर वादग्रस्त विधानावरून मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या अभिनेत्या एजाज खानची (Ajaz Khan) आज (24 एप्रिल) सुटका झाली आहे. वांद्रे कोर्टात 1 लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका झाली आहे. दरम्यान एजाज खानवर मानहानीचा (Defamation), अभद्र भाषेत टीका करण्याचा आरोप होता. कलम 153A अंतर्गत समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याचा आरोपावर त्याची अटक झाली होती. यासोबतच कलम117 आणि 121 देखील लावण्यात आले होते.

सोशल मीडियावर फेसबूक लाईव्ह सेशन मध्ये बिग बॉस फेम एजाज खान याने असं वक्तव्य केले होते की, "मुंगी मेली तरी त्याला मुस्लीम जबाबदार, हत्ती मेला तर मुस्लिम जबाबदार, दिल्ली भुकंपाने हादरली तरी त्याला मुस्लीम जबाबदार, काहीही झालं तरी त्याची जबाबदारी मुस्लिम समुदयावर येते. पण तुम्हांला या कटामागे कोण आहे ठाऊक आहे का? अभिजीत बिचुकले, एजाज खान या सेलिब्रिटींना जिंकायची होती आमदारकी; जनतेने दिली NOTA पेक्षाही कमी मते

ANI Tweet 

एजाज खान हा अभिनेता असून 'अल्लाह के बंदे', रक्तचरित सारख्या सिनेमांमध्ये तो झळकला होता. काही मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. बिग बॉस या लोकप्रिय रिएलिटी शोमध्येही त्याने सातव्या सीझनमध्ये प्रवेश केला होता. 2018 साली ऑक्टोबर महिन्यातही त्याला बॅन केलेल्या ड्रग्जचा साठा केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते.