मुंबई (Mumbai) मध्ये एका 3 वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आहे. दरम्यान हा कथित बलात्कार 2 अल्पवयीन मुलांनी केल्याचा सांगितलं जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ANI Tweets च्या माहितीनुसार, बलात्काराच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही मुलांना बालसुधार गृहात(Correctional Home)पाठवल्याची माहिती कस्तुरबा मार्ग पोलिस स्टेशनचे (Kasturba Marg Police Station) सिनियर पोलिस इन्स्पेक्टर यांनी दिली आहे.
दरम्यान या महिन्यात जळगाव मध्येही एका 20 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली होती. ही तरूणी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या तरूणीची छेडछाड करून, सामुहिक बलात्कारानंतर तिला विष पाजून तिची हत्या झाल्याची माहिती नंतर उघड झाली आहे.
ANI Tweet
#Maharashtra Three-year-old girl allegedly gang-raped by two minor boys, case registered under the POCSO Act. The two boys have been sent to a correctional home: Senior Police Inspector, Kasturba Marg Police Station, #Mumbai
— ANI (@ANI) November 21, 2020
15 वर्षीय एका तरूणीवर देखील ऑक्टोबर महिन्यात एका 16 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याच्या प्रकरणी ऑक्टोबर महिन्यात ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान महाराष्ट्रातही लवकरात लवकर स्त्रीया, मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावलं उचलावीत यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. 'दिशा' कायदा जाणून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रात आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर तो राबवण्यासाठी मागील वर्षी राज्याचे गृहमंत्री आंध्रप्रदेशच्या दौर्यावरही गेले होते.आता महाराष्ट्रालादेखील त्याच्या अंमलबजावणीची प्रतिक्षा आहे.