Mumbai: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 14 लाख नागरिकांवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने कारवाई
Representational Image | (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत मुंबई महापालिका श्(BMC) आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून 14 लाख नागरिकांच्या विरोधात कारवाई केली आहे. तर कारवाई करण्यात आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने त्यांच्याकडून दंड स्विकारण्यात आला आहे. आतापर्यंत 28.2 कोटी रुपयांचा दंड वसूल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हा दंड 16 फेब्रुवारी ते 1 जुलै. तसेच गेल्या वर्षात 8 एप्रिल ते यावर्षीच्या 1 जुलै दरम्यान महापालिकेने 59.16 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानुसार जवळजवळ 29.38 लाख नागरिकांवर कारवाई केली गेली.

मुंबई महापालिकेनुसार, 2,02,050 नागरिक हे के-वॉर्डातील असून यामध्ये अंधेरी (पश्चिम), वर्सोवा आणि जुहू बीच परिसराचा समावेश होते. येथून 4 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर वॉर्डाच्या पश्चिम उपनगरात बहुतांश इमारती आणि मजले सील केल्या गेल्या. कारण या ठिकाणी सर्वाधिक कोरोनाच्या रुग्ण आढळून येत होते. यामध्ये 66 इमारती सील केल्या असून 33 या के-पश्चिम मधील आहेत. तसेच 2143 मजले सील केल्यापैकी हे 431 हे के-पश्चिमेकडील असल्याचे सांगण्यात आले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात 8,395 जण कोरोना मुक्त, 9,489 नागरिकांना COVID-19 संसर्ग)

तर जुलै 1 रोजी या एकाच दिवशी 3784 नागरिकांच्या विरोधात महापालिकेच्या क्लिनअप मार्शल कडून कारवाई करण्यात आली आहे. यामधून त्यांनी 7,56,800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिकेने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असल्याचे केले आहे. मास्क न घातल्यास 200 रुपयांचा दंड आकारला जातो. जवळजवळ 1200 मार्शल तैनात करण्यात आले आहेत. यापैकी महापालिकेच्या 24 वॉर्डात प्रत्येकी 50 मार्शलची नेमणूक केली असून ते कोविड19 च्या विरोधात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.