मुंबई: डोंबिवली - कोपर स्थानका दरम्यान लोकलमधून पडून 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू
Mumbai Local Ladies Special (Photo Credits: File Image)

मुंबई लोकल (Mumbai Local) ही मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते. मात्र आज सकाळी एका दुर्दैवी अपघातामध्ये 22 वर्षीय तरूणीने तिचा जीव गमावला आहे. डोंबिवली - कोपर स्थानकादरम्यान आज सकाळी चार्मी पासड (Charmi Pasad) या तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. सकाळी गर्दीच्या वेळेस तिचा गाडी पकडताना हात सुटला आणि पडून मृत्यू झाला. मध्य रेल्वेचं 14 डिसेंबरपासून नवं वेळापत्रक जाणून घ्या

चार्मी ही देसलेपाडा - भोपर या भागातील रहिवासी आहे. चार्मीने सकाळी 9च्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून सीएसएमटी कडे जाणारी फास्ट ट्रेन पकडताना हा अपघात झाला. डोंबिवली स्थानकात सकाळच्या वेळेस गर्दी ऑफिसला लेटमार्क लागू नये म्हणून चार्मी घाईत चढली. गर्दीतून आत जाण्याचा तिने प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला आणि ती हात निसटून खाली पडली. जखमी अवस्थेमध्ये असलेल्या तरूणीला तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिला रूग्णालयात नेले मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं आहे. मुंबई लोकलमध्ये महिला असुरक्षित; रेल्वे सर्वेक्षणात समोर आलेली आकडेवारी ठरली धक्कादायक बाब

मुंबई लोकल मधून गर्दीमुळे पडून मृत्यू झाल्याचं प्रमाण अधिक आहे. मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनवरही मागील काही दिवसांत गर्दीचा प्रश्न पाहता रेल्वे लोकल वाढवण्याची मागणी आहे.