मध्य रेल्वेचं 14 डिसेंबरपासून नवं वेळापत्रक जाणून घ्या
Mumbai local | (Archived and representative images)

मुंबई लोकलने दररोज लाखो हजारो मुंबईकर प्रवास करत असतात. तर मुंबईच्या मध्य रेल्वे स्थानकात प्रवाशांची अधिक गर्दी दिसून येते. तसेच मध्य रेल्वे येण्याच्या वेळेत उशीर झाल्यास प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे या मार्गावर लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून करण्यात येत आहे. परंतु यावर तोडगा निघाला नसून फक्त लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे यापुढील स्थानक दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर यांच्यासह अन्य ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी स्थानकात दिसून येते. यामुळे लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. तर मुख्य मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यासाठी 40 फेऱ्यांच्या वेळात बदल करण्याची शक्यता आहे. यामधील काही लोकलच्या फेऱ्या दोन ते पाच मिनिटांनी मागे पुढे सोडण्याचा विचार सुरु आहे. तर 14 डिसेंबर पासून मध्य रेल्वेवर नवे वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामध्ये सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा या मुख्य उपनगरीय मार्गांसाठी लोकलचे हे नवे वेळापत्रक लागू होणार आहे.(ठाणे: रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ कर्मचाऱ्याने वाचवले प्राण Watch Video)

तर मध्य रेल्वेच्या लोकला काहीसा वेळ होत असल्याने ती नियोजित वेळेत स्थानकात पोहचण्यासाठी लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच ठाणे ते दिवा, कु्र्ला ते परळ आणि सीएसएमटी पर्यंतचा पाचवा-सहावा मार्ग पूर्ण झाल्यास मेल एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे 100 पेक्षा अधिक जास्त लोकलची भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.