मुंबई लोकलमध्ये महिला असुरक्षित; रेल्वे सर्वेक्षणात समोर आलेली आकडेवारी ठरली धक्कादायक बाब
Mumbai Local Ladies Special (Photo Credits: File Image)

रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणा-या छेडछाडीच्या घटना मुंबईसाठी काही नवीन नाही. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र तरीही या घटना म्हणाव्या तितक्या कमी झाल्या नाही. म्हणूनच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एका खासगी संस्थेच्या मदतीने विरार ते डहाणू, नेरळ ते कर्जत या स्थानकांदरम्यान प्रवास करणा-या महिला प्रवाशांचे नुकतेच सर्वेक्षण झाले. यात पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) विरार ते डहाणू  (Virar To Dahanu) दरम्यान प्रवास करणा-या 45% महिलांनी तर मध्य रेल्वेच्या (Central Railway) नेरळ ते कर्जत (Neral To Karjat) दरम्यान प्रवास करणा-या 40% महिलांनी प्रवासात छळवणूक होत असल्याचे सांगितले आहे.

एबीपी माझा ने दिलेल्या वृत्तानुसार, विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणा-या महिलांना अनेकदा छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तसेच फलाटावर गर्दी असताना असे प्रकार ब-याचदा आपल्यासोबत होत असल्याचे अनेक महिलांचे म्हणणे आहे. Watch Video: उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थिनींची छेड करू नका म्हणणाऱ्या शिक्षकाला मुलांकडून मारहण

इतकंच नव्हे तर अनेक काही महिलांना रेल्वे स्थानकात किंवा रेल्वेत असलेल्या अनधिकृत फेरीवाले, स्टॉल्सवाले यांच्यामुळे त्रास सहन करावा लागतो.

हीच परिस्थिती मध्य रेल्वेवरील नेरळ ते कर्जतदरम्यान प्रवास करणा-या प्रवाशांची आहे. कर्जत स्थानक हे गर्दीचे ठिकाण असल्यामुळे येथून प्रवास करणा-या महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळी आसनव्यवस्था उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. त्यात दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या महिलांना पुरुषांकडून छेडछाड होत असल्याचे समोर आले आहे.