
कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मुंबई (Mumbai) शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत एका दिवसात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 150 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 1 हजार 549 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 16 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधीत झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच 170 हून अधिक देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, काही राज्यात 31 एप्रिलपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 9 हजार 152 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 857 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1895 वर पोहचली आहे. यात 127 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 208 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे. तर एकट्या मुंबई शहरात कोरोनाचे 1 हजार 649 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 141 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: 150 new positive cases & 9 deaths reported today in Mumbai. Of the 9 deaths today, 7 had co-morbidity. Total number of cases now stands at 1549 and total deaths at 100 in the city. 43 patients have been discharged today; total 141 discharged till date. #COVID19 pic.twitter.com/n5eFSfYDWe
— ANI (@ANI) April 13, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.