Representational Image (Photo Credit: unsplash.com)

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गावकवाड (Varsha Gaikawad) यांनी घेतला होता. यामुळे विद्यापीठांच्या इतर परीक्षाही रद्द झाल्या आहेत, असे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या (University Exams) परीक्षा घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने यावर कोणतीही चर्चा केली नाही. परंतु, विद्यापीठांतील परिक्षा घ्यायची की नाही, यासाठी कुलगुरूंची समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत म्हणाले आहेत. एवढेच नव्हेतर, करोनाच्या पार्श्वभूमीवर जर आणीबाणीची परिस्थितीत निर्माण झाल्यास भविष्यात परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात काल घोषणा केली होती. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, कोरोना विषाणूमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला एसएससीच्या विद्यार्थ्यांचा दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठातील इतर परिक्षाही रद्द होणार, असा अंदाज दर्शवण्यात येत होता. परंतु, कोणत्याही महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला नाही. यासाठी चार कुलगुरुंची कमिटी केलेली आहे. या कमिटीतून जी शिफारस येईल त्यानंतर यासंबंधी निर्णय होईल. अगदीच कोरोना विषाणूमुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल. मात्र सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. हे देखील वाचा-मुंबई: भाटीया हॉस्पिटलमध्ये 11 नव्या नर्स कोरोना पॉझिटीव्ह

कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला हादरून टाकले आहे. कोरोनामुळे सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राला मोठा बसला आहे. एवढेच नव्हेतर, यामुळे दहावीच्या भूगोलाच्या पेपरासह नववी आणि अकरावीची परिक्षा रद्द करावी लागली आहे. तसेच विद्यापीठांतील इतर परिक्षा रद्द होण्याचा उंबरठ्यावर आहेत.