मुंबई: भाटीया हॉस्पिटलमध्ये 11 नव्या नर्स कोरोना पॉझिटीव्ह

दक्षिण मुंबईमधील भाटीया हॉस्पिटलमध्ये नव्या 11 नर्सची कोव्हिड 19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान काल (12 एप्रिल) पर्यंत एकूण 25 नर्सला ताडदेवच्या भाटीया हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई: भाटीया हॉस्पिटलमध्ये 11 नव्या नर्स कोरोना पॉझिटीव्ह
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दक्षिण मुंबईमधील भाटीया हॉस्पिटलमध्ये नव्या 11 नर्सची कोव्हिड 19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान काल (12 एप्रिल) पर्यंत एकूण 25 नर्सला ताडदेवच्या भाटीया हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वॉकहार्ट हॉस्पिटलनंतर मुंबईमधील भाटीया हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्यांमध्ये अग्रस्थानी आहेत. मुंबईच्या वॉकहार्ट हॉस्पिटलचे सुमारे 52 कर्मचारी हे कोरोनाबाधित आहेत. जसलोक हॉस्पिटलमध्ये 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर पालिकेकडून बंद करण्यात आलेले हे हॉस्पिटल आज (13 एप्रिल) पासून पुन्हा रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भाटीया हॉस्पिटलमध्ये 150 आरोग्य कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर 139 जणांचा रिपोर्ट नकारात्मक आला तर 11 जण कोरोनाबाधित आढळली आहेत. दरम्यान भाटीयामध्ये 3 कोरोनाबाधित रूग्ण होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सार्‍या कर्मचार्‍यांची त्यानंतर कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी (10 एप्रिल) 14 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यामध्ये नर्स, डॉक्टर्स सह हाऊसकिपिंगच्या व्यक्तीचादेखील समावेश आहे. मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये मात्र कमीत कमी कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये कामकाज सुरू ठेवले जाणार आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या केईएम रूग्णालयामध्ये 40 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा निकाल नकारात्मक आला आहे. मागील आठवड्यात केईएममध्ये कोरोनाबाधित रूग्णाच्या वॉर्डमध्ये काम न केलेल्या डॉक्टर, नर्स व हाऊसकिपिंग स्टाफचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2020 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).