ठाणे (Thane) येथील मुलुंड चेक नाका (Mulund Check Naka) परिसरात असलेल्या मॉडेल कालनी (Modella Colony) या नागरी इमारतीला आग लागल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग (Mulund Check Naka Fire) आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आगीचे कारण आणि आगीत झालेल्या नुकसानीची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या घटनेत आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याची माहिती नाही. आज दिवसभरात राज्यात पुढे आलेली आगीची ही दुसरी घटना आहे. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास तळोजा औद्योगिक वसाहतीतील एजीओक्रिस्ट या केमीकल कंपनीला आग लागली होती.
तळोजा औद्योगिक वसाहतीतील एजीओक्रिस्ट या केमीकल कंपनीला आग लागली होती. ही आग न्यु केमीकल झोन परिसरात प्लाॅट नं ३४ वर असलेल्या एजीओक्रिस्ट कंपनीला लागली. पनवेल , तळोजा , खारघर , येथील अग्निशामन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीतही कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. परंतू, मोठ्या प्रमाणार वित्तहानी मात्र झाली. (हेही वाचा, Taloja MIDC Fire: नवी मुंबईत तळोजा एमआयडीसी रासायनिक कारखान्याला भीषण आग;)
गेल्या काही काळापासून राज्यात निवासी इमारती, औद्योगिक वसाहती, झोपडपट्टी आणि दुकानांना आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मुंबईतील मानखूर्द परिसरातील अत्यंत दाटीवाटीच्या परिसरात असलेल्या एका गोडाऊनला नुकतीच मोठी आग लागली होती. ब्लॅक आईलचा साठा असलेल्या या गोडाऊनची आग आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर पसरली. यात कोणती जीवित हानी झाली नाही. परंतू, वित्तहनी मोठ्या प्रमाणवर झाली. अनेक दुकाने, झोपडपट्या, गोदामे आणि प्लॅस्टीक तयार करणारे कारखाने या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या 15 ते 16 गाड्या काही तास आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
Maharashtra: Fire breaks out at Modella Colony near Mulund Check Naka in Thane (w). Traffic Police officials. Fire fighting operation underway. No casualty reported, so far. pic.twitter.com/8EgNZNRbZF
— ANI (@ANI) February 9, 2021
दरम्यान, कोविशिल्ड या कोरोनावरील लसीमुळे देश आणि जगभरात प्रसिद्ध पावलेल्या सिरम इन्स्ट्यीट्युटलाही काही दिवसांपूर्वी आग लागली होती. ही आग या संस्थेच्या नव्या कार्यालयाला लागली होती. सुदैवाने या ठिकाणी कोविशिल्ड लसीचे कोणतेही काम सुरु नव्हते. त्यामुळे लसीला कोणताही धोका निर्माण झाला नव्हता.