Mumbai University (Photo Credits: mu.ac.in)

दोन-अडीच महिने कायदेशीर लढाई लढल्यानंतर अखेर पदवी परीक्षा घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सार्‍या विद्यापीठांनी घेण्याचा ठरवत परीक्षेच्या तयारीला सुरूवात झाली आहे. आता कोविड संकटाच्या सावटाखाली परीक्षा घेताना कुणाचं वर्ष वाया जाऊ नये साठी मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान यामध्ये पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आता 20 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी प्रवेश अर्ज भरू शकतात. Mumbai University Exam 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेदरम्यान Digital Supervision द्वारे ठेवणार लक्ष; विद्यार्थ्यांचे इंटरनेट होणार फ्रीझ

मुंबई विद्यापीठांमध्ये बॅकलॉकच्या परीक्षा 25 सप्टेंबर पासून तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पार पडतील. यामध्ये विद्यार्थ्यांना यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठेवण्यासाठी परीक्षा ऑनलाईन माध्यमातून पार पडतील. तसेच प्रश्नपत्रिका एमसीक्यु पद्धतीची असेल. त्याची क्वचेन बॅंक (Question Bank) विद्यार्थ्यांना दिली जाईल असे देखील सांगण्यात आले होते. 15  सप्टेंबरपासून  व्हाय  वा म्हणजेच तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स सुरू झाल्या आहेत. तोंडी परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे. यासाठी झूम अ‍ॅप, गूगल मीट, स्काईपचा वापर केला जात आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकालाच्या प्रती यंदा दिल्या जाणार आहेत. त्या दरवर्षी प्रमाणेच असतील. गुणपत्रिकेवर कोविड 19 चा उल्लेख नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी निर्धास्त रहावं असे देखील मंत्री उदय सामंत यांनी आश्वस्त केले आहे.

यंदा अंतिम सत्राच्या परीक्षेला तब्बल 2,47,500 विद्यार्थी सामोरे जाणार आहे. यामध्ये 1,70,000 विद्यार्थी रेग्युलर आहेत तर उर्वरित विद्यार्थी हे बॉकलॉगच्या परीक्षांसाठी सामोरे जाणार आहे. यंदा परीक्षा ऑनलाईन होणार आहे. ज्यांच्याकडे संबंधित सामग्री नसेल त्यांना ऑफलाईन परीक्षा देण्याचा मार्ग देखील खुला असेल. त्यासाठी कडक नियमावली असेल.