
एसटीच्या (ST) विविध वर्ग 1 आणि 2 अधिकारी पदासाठी ऑनलाइन परीक्षा 17 ,18, 19 मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षेची प्रवेशपत्रे एसटी महामंडळाच्या www.msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. या संबंधितची माहिती उमेदवारांच्या अर्जावर नमूद केलेल्या ई-मेल आणि मोबाईल नंबरवर देण्यात आली आहे.
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेच्या किमान दीड तास आधी हजर रहावे, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून 100 गुणांची असेल. यात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. परीक्षेचा कालावधी दीड तासांचा असणार आहे. (एसटी बस उशीरा पहोचणार असल्ल्यास प्रवाशांना मिळणार माहिती; राज्य परीवहन विभागाचा अनोखा उपक्रम)
अद्याप प्रवेशपत्रं उपलब्ध न झालेल्या आणि इतर काही शंका असल्यास उमेदवारांनी 18005722005 या निःशुल्क दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधवा. तसंच परीक्षा काळात उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे कॉपीचा प्रयत्न करु नये, असे आवाहन एसटी महामंडळच्या वतीने करण्यात आले आहे.