![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/04/Mobile-Ban-380x214.jpg)
प्रवाशांचा एसटी प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून आता महामंडाळाने एसटी चालकांवर मोबाइल बंदी करण्याचा निर्णय अधिक कठोर केला आहे. आता एसटी चालवण्यासाठी स्टेअरिंग हाती घेण्यापूर्वी बस चालकाला त्याचा मोबाईल वाहकाकडे द्यावा लागणार आहे. एसटीचा हा निर्णय आता स्वमालकीच्या गाड्यांसह भाडेतत्त्वावर असलेल्या वाहनांसाठी देखील लागू असणार आहे. राज्यात साध्या एसटी सह स्लीपर, शिवनेरी, शिवाई, ई-शिवनेरी, अश्वमेध, हिरकणी, शीतल या सार्या श्रेणीमधील एसटींसाठी लागू असणार आहे. सोमवार 20 नोव्हेंबर पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. चाल्क दोषी आढळला तर त्याच्यावर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
विनावाहक सेवा देणाऱ्या एसटीत चालकांनी आपल्या बॅंगेत मोबाईल ठेवावा. मोबाईलसह ब्ल्यूटूथ, इयरबड्, हेडफोन आणि अन्य तंत्रज्ञानाच्या वापरावरही महामंडळाने पूर्णपणे बंद घातलेली आहे.
एसटी बस चालवताना मोबाईल वर बोलणं, व्हिडिओ पाहणं, गाणी लावणं यामुळे चालकाची एकाग्रता भंग होऊ शकते. त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा बस चालवताना एसटी चालक मोबाईलचा वापर करत असल्याचे अनेक व्हिडिओमधून समोर आले आहे. अशा प्रकारांमुळे एसटीची सामाजिक प्रतिष्ठा मलिन होऊन त्याचा गंभीर परिणाम एसटीच्या प्रवाशांवर होतो, यामुळे धोरणात्मक निर्णय घेतल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. MSRTC च्या ताफ्यात पहिल्यांदाच नॉन एसी स्लीपर कोच बस; मुंबई तून कोकणात जाणार 2 गाड्या .
दरम्यान एसटी महामंडळाच्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी नंतर एसटी च्या सुरक्षा व दक्षता खात्यासह सर्व मार्ग तपासणी विभागांनी रोजच्या तपासणीत मोबाइल बंदीचीही तपासणी करावी. चालक मोबाइलवर बोलताना किंवा गाणी ऐकताना आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. कारवाईचा विभागनिहाय अहवाल मुख्यालयाला पाठवावा, अशा लेखी सूचना मुख्यालयाने सर्व विभागांना दिल्या आहेत.