MP Vinayak Raut Arrested: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू (Barsu) येथे गेलेले शिवसेना (यूबीटी) लोकसभा खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. स्थानिकांनी या रिफानरीला विरोध केला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक आक्रमक झाले आहेत.
गावकऱ्यांना भेटण्यासाठी गावात जायचे असलेल्या राऊत यांना पोलिसांनी गावात येण्यापासून रोखले. त्यानंतर राऊत आणि त्यांच्या साथीदारांनी रस्त्यावर बसून यास विरोध केला. बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच स्थानिकांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (हेही वाचा - Maharashtra APMC Election 2023: कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान, ग्रामीण भागावर कोण वर्चस्व राखणार?)
रिफायनरी विरोधात मोर्चा काढत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक....!#No_To_Barsu_Refinery pic.twitter.com/8j3BXK8qHK
— Ashish🎲 (@error040290) April 28, 2023
Ratnagiri Barsu Refinery | रत्नागिरीतील बारसूत स्थानिकांचा उद्रेक#RefineryProject #ratnagiri #Barsu #Solgaon #uddhavthackeray #vinayakraut #thackeraygroup #detain pic.twitter.com/QPdsLguHqP
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2023
दरम्यान, बारसूमध्ये सध्या तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करण्यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकावर पोलिसांचे अमानुष अत्याचार करत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ही दडपशाही असून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी राऊत यांनी बुधवारी केली होती. त्यानंतर आज ते या आंदोलनात सहभागी झाले. मात्र, आज राऊत यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.