Maharashtra Rajya Kustigir Parishad: शरद पवार यांना भाजपचा धक्का, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदी खासदार रामदास तडस बिनविरोध
Ramdas Tadas | (Photo Credit - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भाजपने क्रीडा वर्तुळातही धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच बर्खास्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Kustigir Parishad) अध्यक्ष पदावर आता भाजप खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेची नवी दिल्ली येथे वार्षीक सर्वसाधारण बैठकीवेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बर्खास्तीचा निर्णय झाला होता. त्यानंतर आता अध्यक्ष पदावर तडस यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीघांनी अर्ज केले होते. एकूण तीन अर्जापैकी काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील आणि रामदास तडस यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी मागे घेतल्याने तडस यांचा एकमेव अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे तडस यांची बिनविरोधत निवड झाली. (हेही वाचा, Neeraj Chopra: नीरज चोप्रा कॉमनवेल्थ स्पर्धेतून बाहेर; भारताला मोठा धक्का)

दरम्यान, भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी स्पष्ट केले होते की, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्याने ती बरखास्त करण्यात येत आहे. या आधी बरीच वर्षे शरद पवार हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. तोमर यांनी पुढे म्हटले होते की, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला आम्ही 15 वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यास अनेकदा सांगितले. 2019 मध्येही 23 वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यास सांगण्यात आले. परंतू कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे आता अध्यक्ष पदासाठी पुन्हा निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.