Gajanan Kirtikar On BJP: एकनाथ शिंदे गटातील खासदाराचा भाजपवर सापत्न वागणूकीचा आरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
Gajanan Kirtikar (PC - Instagram)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदाराने सत्तेतील मित्रपक्ष भाजपवर मोठा आरोप केला आहे. गजानन कीर्तीकर असे या खासदाराचे नाव आहे. गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे गटाला सापत्नभावाची वागणूक मिळते आहे. शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक आहे. त्यामुळे आमच्या शिवसेनेला त्याप्रमाणेच दर्जा आणि वागणूक मिळाली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. भाजपसोबत केंद्रामध्ये शिवसेनेचे 13 खासदार सहभाही आहे.

गजानन कीर्तिकर यांनी पुढे म्हंटले की, शिवसेना जर रालोआचा घटक असेल तर खासदारांची कामेही त्याच पद्धतीने झाली पाहिजेत. निवडणुकीमध्ये जागांचे वाटपही त्याच पद्धतीने व्हायला हवे. सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढली होती. त्यापैकी आमचे 18 खासदार निवडून आले. त्यामूळे आता आगामी लोकसभा निवडणुकीतही तसेच जागावाटप व्हावे. आम्ही लढवलेल्या जागा आमच्याकडेच राहाव्यात त्यांनी (भाजप) लढवलेल्या जागा त्यांच्याकडे राहाव्यात, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पक्षाच्या बैठकीत केली असल्याचे गजानन कीर्तीकर यांनी सांगितले.

दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या आरोपामुळे राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खास करून एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात कोणतीच एकवाक्यता आणि सर्वाच काही आलबेल आहे असे खात्रीने सांगता येत नाही, या दव्याने जोर पकडला आहे. (हेही वाचा, New Parliamentary Leader Of Shiv Sena: संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवत शिवसेनेकडून गजानन किर्तीकर यांची नियुक्ती)

भाजपला घेरण्यासाठी देशभरात भाजपविरोधी विचारांचे लोक, राजकीय पक्ष एकत्र येत आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या रुपात भजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी एकट्या पडलेल्या भाजपला शिवसेना (शिंदे गट) सोबत असणे फायद्याचे आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून सुरू असलेली ही युती पुडच्या निडणुकित कायम राहणार का? याबाबत उत्सुकता आहे. त्यातही गजानन कीर्तिकर यांच्या आरोपांमुळे ही उत्सकता अधिक वाढली आहे.