Thane: सोमवारी सकाळी ठाणे (Thane) शहरातील घोडबंदर रोडवर (Ghodbunder Road) मोटारसायकल एका खांबाला धडकल्याने एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघानंतर दुचाकीला आग (Fire) लागली. सकाळी 5.30 च्या सुमारास अपघाताबाबत अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले, असे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी (Yasin Tadvi) यांनी पीटीआयला सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, मीरा रोड भागातील हा तरुण आपल्या मोटारसायकलवरून घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना मेट्रो मार्गाच्या कामाच्या एका खांबावर त्याचे वाहन आदळले. तो खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या धडकेमुळे मोटारसायकलला आग लागली आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली. सतर्कतेनंतर, स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली. (हेही वाचा - Mumbai Shocker: धक्कादायक! जोगेश्वरी परिसरात मांसाच्या व्यापारासाठी गोण्यांमध्ये बांधून नेणाऱ्या भटक्या कुत्र्यांची सुटका; Watch Video)
तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात, ठाणे शहरात शनिवारी सकाळी कारमधून प्रवास करताना वाहनाला आग लागल्याने दोन जण थोडक्यात बचावले होते. यानंतर कार जळून खाक झाली होती. कार एका इमारतीच्या लॉबी एरियाजवळ येत असताना तिला अचानक आग लागली. गाडीतील दोन प्रवासी वेळेत बाहेर उडी मारण्यात यशस्वी झाले होते. सुदैवाने मोठा अपघात टळला.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आरडीएमसीच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत कारची राख झाली होती, असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. कारला आग का लागली याचे कारण तपाण्यात येत आहे.